मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

किल्ले(Forts) लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जाणून घ्या "रोहिडा" किल्लाविषयी थोडक्यात माहिती | Rohida Fort

रोहिडा ( Rohida Fort)  हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे.         सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहिडेश्वर’. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहिडेश्वर किल्ला हे रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. रोहिडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहिडेश्वर किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते. किल्ल्याचा इतिहास:                         या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तिसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशाहीने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्यातहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून इ.स. १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहिडा किल्ल्याची निम्मी देशमुख

लोहगड किल्लाविषयी थोडक्यात माहिती | Lohgad Fort

गडकोटांच्या या महाराष्ट्रात प्रत्येक दुर्गाला स्वत:ची काही ना काही वैशिष्टय़े आहेत. लोहगडाचा अद्वितीय असा प्रवेशमार्ग यापैकीच एक! सर्पाकार मजबूत तटबंदी असलेला लोहगड किल्ला (Lohgad Fort) नावाप्रमाणेच लोहासारखा मजबूत, बुलंद आणि अजिंक्य आहे. लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ. स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. भौगोलिक स्थान लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशन नजीकच दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे. त्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधला आहे विसापूर अथवा संबळगड. लोहगडावरून पवनेच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते. पलीकडेच तिकोना उर्फ वितंडगड नावाचा अजून एक किल्ला आहे. तुंग उर्फ कठीणगडही येथेच आहे. नाणे मावळ आणि पवन मावळयांच्यामधील पर्वतराजीत हा दुर्ग वसलेला आहे. किल्ल्याचा इतिहास: (महत्वाच्या ऐतिहासिक नोंदी :  १४६४ साली लोहगडावर दुसरा बुऱ्हाणशाह कैदेमध्ये होता, १६४८ साली शिवाजीमहाराजांनी लोहगड जिंकला). लोहगड किल्ला Lohgad Fort  हा अत

तोरणा किल्ला | Torna Fort

                सिंहगड सिंहाची गुहा असेल तर तोरणा गरुडाचे घरटे आहे.’ आणि ही अप्रतिम उपमा दिली आहे इंग्रज अधिकारी जेम्स डग्लसने. उत्तुंग कडे व खाली खोल द-या पाहून ज्याचा धीर खचत नाही अशा व्यक्तींसाठी तोरणा सोपा नाही, अश्या या तोरणा गडाबद्दल थोडी माहिती...             तोरणा (Torna Fort)   हा महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री  पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे. तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातलादुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे. इतिहास: छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महारा

तुंग किल्ला | Tung Fort

तुंग ( Tung Fort )  हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. ११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता. कसे जाल ? या गडावर जाणार्‍या सर्व वाटा पायथ्याच्या तुंगवाडीतूनच जातात. या वाडीतून गडावर जाण्यास साधारणत: ४५ मिनिटे लागतात. गडमाथा तसा लहान असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो. १) घुसळखांब फाट्यामार्गे :- गडावर जाण्यासाठी लोणावळा स्टेशनवर पोहोचावे. येथून भांबूर्डे अथवा आंबवणे कडे जाणारी एस.टी. पकडून २६ कि.मी. अंतरावरील घुसळखांब फाट्यापाशी उतरावे. या फाट्यापासून दीड तासांची पायपीट केल्यावर आपण ८ कि.मी. अंतरावरील तुंगवाडीत पोहोचतो. येथून गडावर पोहचण्यास ४५ मिनिटे लागतात. २) ब्राम्हणोली - केवरे अनेकजण तिकोना ते तुंग असा ट्रेक देखील करतात. यासाठी तिकोना किल्ला पाहून तिकोना पेठेत उतरावे आणि काले कॉलनी चा रस्ता धरावा. वाटेतच ब्राम्हणोली गावं लागते. या गावातून लॉंच पकडून पवनेच्या जलाशयात जलविहाराची मौज लुटत पलीकडच्या तीरावरील केवरे या गावी यावे. केवरे गावा पासून २० मिनिटातच आपण तुंगवाड

तिकोना किल्ला | Tikona Fort

तिकोना  ( Tikona Fort )हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.   पवना नदीवरील धरणाजवळ पुण्याच्या साधारण ६० कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० फूट उंच आहे. तुंग किल्ला ३-४ कि.मी अंतरावर दिसतो. किल्ल्याच्या त्रिकोनी आकारामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे . इतिहास :       इ.स. १५८५ च्या सुमारास निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशहा याने हा किल्ला जिंकला आणि किल्ला निजामशाहीत सामील झाला. या गडाबद्दलचा इतिहास फारसा कुठेही उपलब्ध नाही. शिवरायांनी १६५७ मध्ये जुन्या निजामाकडुन कोकणातील माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, तळा व कर्नाळा या किल्ल्यांसोबत हा किल्ला देखील आपल्या स्वराज्यात सामील करुन घेतला व सर्व निजामशाही कोकण शिवरायांच्या हाताखाली आले. या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवनमावळावर देखरेखा ठेवण्यासाठी होत असे. सन १६६० या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. इ.स. १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर

रामशेज किल्ला | Ramshej Fort

रामशेज किल्ला ( Ramshej Fort ) रामशेजची सविस्तर माहिती...  रामशेज किल्ला ( Ramshej Fort ) हा नाशिक शहराच्या उत्तरला14 कि.मी. अंतरावर आहे. नाशिकजवळच्या दिंडोरी पासून हा 10 मैलाच्या अंतरावर आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगडअसे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे किल्ले घनदाट जंगलात आहेत, डोंगर दर्‍यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे.रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड, परंतु तो देखील 8 कोस अंतरावर होता. ही सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी होता. किल्ल्यावर जाण्यासाठीचा मार्ग : गडाच्या पायथ्याशी असणार्‍या नाशिक-पेठ मार्गावरील आशेवाडी ह्या गावातून किल्ल्यावर जायला मळलेली वाट आहे. तासाभरात किल्ल्यावर पोहोचता येते. किल्ल्याचा विस्तार प्रचंड असला तरी पाण्याचे टाके, स्थानिक देव-देवतांची मंदिरे आणि पडझड झालेली तटबंदी ह्याखेरीज किल्ल्यावर फारसे बघण्यासारखे काही नाही. हा किल्ला मराठ्यांनी मुघल सैन्याला केलेल्या चिवट प्रत

रायगड किल्ला | Raigad Fort

किल्ले रायगड   ( Raigad Fort ) किल्ले रायगड  (  Raigad  Fort )   रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत  असून  समुद्रसपाटीपासून  सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून [इ.स.चे १६ वे शतक|१६ व्या शतकात] याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर ज