सिंहगड सिंहाची गुहा असेल तर तोरणा गरुडाचे घरटे आहे.’ आणि ही अप्रतिम उपमा दिली आहे इंग्रज अधिकारी जेम्स डग्लसने. उत्तुंग कडे व खाली खोल द-या पाहून ज्याचा धीर खचत नाही अशा व्यक्तींसाठी तोरणा सोपा नाही, अश्या या तोरणा गडाबद्दल थोडी माहिती... तोरणा (Torna Fort) हा महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे. तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातलादुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले आहेत, पैकी एका पदरावर तोरणा व राजगड आहेत. दुसऱ्या पदराला भुलेश्वर रांग असे म्हणतात. पुण्याच्या नैर्ऋत्येस असलेल्या पर्वतराजीमध्ये १८.२७६ उत्तर अक्षांश व ७३.६१३ पूर्व रेखांशावर हा किल्ला आहे. याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. गडाच्या पश्चिमेला कानद खिंड, पूर्वेला बामण व खरीव खिंडी आहेत. पुण्यापासून रस्त्याने तोरण्यापर्यंतचे अंतर ६० कि.मी. आहे. इतिहास: छत्रपती शिवाजी महाराज|शिवाजी महारा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा